भाजपच्या आमदारांनी दहा वर्षात काय विकास केला – आ. अमित देशमुख यांची आ. निलंगेकरावर अप्रत्यक्ष टीका
जागृती शुगर ने तालुक्यातील अर्थचक्र बदलले
सत्ता परिवर्तन करा देवणी वळू संशोधन केंद्र पुन्हा देवणीत आणू
देवणी दि.२५. : निलंगा विधासभा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भाजपच्या आमदारांनी गेल्या दहा वर्षात विकासाची काय काम केली आहे? असा सवाल कोंग्रेसचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी करत उठसूठ बाभळगाव करावर बोलत असून माझ्यावर टीपनी करून सामान्य माणसाचे प्रश्न सुटत नाही असे सांगून देवणी तालुक्यातील एसटी डेपो, क्रीडा संकुल, रेल्वे ही आश्वासने दिलेली केराच्या टोपलीत टाकलेली आहेत अशा भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा व सर्वसामान्य सुशिक्षित काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे यांना अधिक मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन राज्याचे माजी मंत्री कोंग्रेसचे नेते स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे ते लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ देवणी येथील बाजारात गुरुवारी जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते
व्यासपिठावर आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे,अशोकराव पाटील निलंगेकर, मल्लिकार्जुन मानकरी, शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे, कोंग्रेसचे अभय साळुंके, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय शेटे, शिवसेनेच्या डॉ शोभा बेंजर्गे, डॉ अरविंद भातांब्रे, अजित बेलकुने, अविनाश रेश्मे,जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, देवणीच्या नगराध्यक्षा कीर्ती घोरपडे, निरीक्षक संतोष देशमुख अमर मानकरी, हरिराम कुलकर्णी, अजित माने,विजयकुमार पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते
मराठवाड्यात महाविकास आघाडी आघाडीवर
हि लोकसभा निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असून महायुतीमधील भाजपने जी तोडफोड निती अवलंबली आहे ती सामान्य लोकांना आवडलेले नाही त्याची धग लोकांत राग आहे तो उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतपेटी रुपात दाखवावा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देवणी तालुक्यातील मतदारांनी डॉ शिवाजीराव काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे एक सुसंस्कृत प्रामाणिक माणूस म्हणून त्यांना निवडून द्या ते आपली प्रामाणिक पने सेवा करतील अशी अपेक्षा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली
देवनीचा वळू हरवला परळीत सापडला
आमदार अमित देशमुख यांनी ज्या देवणी तालुक्याने वळू दिला त्याचे संशोधन केंद्र देवनित व्हायला पाहिजे पण स्थानीक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या लोकांनी काहीच केलं नाही अशी टीका करत वळू हरवला परळीत सापडला अशी मिश्किल टिपनी करत आमची सत्ता आल्यास देवणी वळू संशोधन केंद्र आणण्याची जबाबदारी माझी आहे असा शब्द त्यांनी देताच लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली अमीत देशमुख साहेब यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या
यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक श्री मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कोंग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जून मानकरी, कोंग्रेसचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे यांनी मनोगत व्यक्त केले जाहीर सभेस देवणी, तळेगाव बोरोळ, जवळगा तसेच तालुक्यातील विविध गावातील शेतकरी मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार अमीत देशमुख यांचे तळेगाव जागृति शुगर येथे हेलिपॅड येथे स्वागत
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे जागृती शुगर येथील कारखाना स्थळी हेलिपॅड येथे हेलिकॉप्टर ने आगमन झाले त्यावेळी त्यांचे जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे,अभय साळुंके मल्लिकार्जुन मानकरी हरिराम कुलकर्णी यांनी स्वागत केले .