ओबीसी आरक्षण समर्थक, चळवळीतील नेते अॅड.श्रीधर कसबेकर यांना विजयी करा – राजेंद्र वनारसे
लातूर ः लातूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅड.कसबेकर श्रीधर हे एकमेव ओबीसी आरक्षण समर्थक चळवळीतील सक्रीय नेते आहेत. त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी आज प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात केले आहे. ते या पत्रकात पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आरक्षण जनजागृती अभियानात अॅड.श्रीधर कसबेकर हे प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांच्या सेवेत कार्यरत होते. त्यांनी मराठा आरक्षण समर्थक असो की, ओबीसी आरक्षण समर्थक असो त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे अशी भुमिका घेवून या निवडणुकीत ते उभे आहेत.
नेत्यांचा गराडा आणि करोडोंचा चुराडा करणार्या उमेदवारांना मतदार जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत-राजेंद्र वनारसे
41 लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि.7 मे 2024 रोजी मतदान होणार असुन मतदारांना विविध प्रलोभनाच्या माध्यमातून आकर्षित करण्यासाठी अनेक मान्यवर नेत्यांच्या सभा लातूर मतदारसंघात घेण्यात आल्या. सभा ह्या होतच असतात पण मतदाराजाने भुलून न जाता चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असते. जो उमेदवार तुमच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध होतो अशाच उमेदवारांची पारख करून त्या उमेदवाराला विजयी करणे हे आपले कर्तव्य आहे. असा उमेदवार म्हणजेच राष्ट्रीय संत संदेश पक्षाचा असुन तो उमेदवार सर्वांच्याच मदतीला धावून येणारा उमेदवार असल्याची भावना राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी बोलून दाखविली.
मंगळवार दि.7 मे 2024 रोजी राष्ट्रीय संत संदेश पक्ष व भारतीय जनविकास महाआघाडीचे पुरस्कृत उमेदवार अॅड श्रीधर लिंबाजी कसबेकर यांना फलंदाज(लरीीांरप) या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावे असे नम्र आवाहन राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र वनारसे, सचिव अॅड.शिवकुमार स्वामी, ह.भ.प.भास्कर महाराज रामेश्वरकर, राजभाऊ साबळे, उमेश उघडे, सौ.पुष्पाताई म्हेत्रे आदिंनी केले आहे.