निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांचे लातूर येथे आगमन
लातूर, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक संजीब बॅनर्जी यांचे लातूर येथे आगमन झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाबाबत संनियंत्रण करण्यासाठी गठीत पथकांच्या कामकाजावर ते देखरेख ठेवणार आहेत.
लातूर शहरातील औसा रोडवरील नवीन शासकीय विश्रामगृह येथे पहिल्या मजल्यावरील गोदावरी कक्षामध्ये श्री. बॅनर्जी यांचे कार्यालय असून त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३८२-२२२११२ आहे, तर ८३२९०१७०३४ हा भ्रमणध्वनी क्रमांक आहे. सर्वसामान्य नागरिकांना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत तक्रार करावयाची असल्यास किंवा या अनुषंगाने काही माहिती द्यावयाची असल्यास त्यांनी शासकीय विश्रामगृह येथील निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या कार्यालयात अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.