लातूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार विविध लोककल्याणकारी योजना राबवून जनसामान्यांचे जिवनमान उंचविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. केंद्र व राज्यासरकारच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विकासाच्या योजना आणि सार्वजनीक उपक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी प्रगतीशिल महाराष्ट्र हे महाप्रदर्शन लातूरात 1, 2 व 3 नोव्हेंबर रोजी आयोजन खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्यावतीने लोकहितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. भारता सोबतच महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढलेला असून विकासाची घोडदौड कायमच सुरू आहे. फ्रेन्डस एक्झबिशन व प्रमोशनच्या माध्यमातून लातूर येथे होत असलेल्या महाप्रदर्शनात विविध स्टॉलच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना एकाच छताखाली मिळत आहे.
या महाप्रदर्शनास निगरिकांसह शालेय विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेती, आरोग्य, औधोगीक, खनन कार्य, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, पर्यटन आदींसह विविध योजना उपक्रमांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत.