निष्कलंक व निर्मळ मनाच्या खा. सुधाकर श्रृंगारेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा ः माजी आमदार बब्रुवान खंदाडे
अहमदपूर/प्रतिनीधी ः निष्कलंक व स्वच्छ चारित्र्य असलेल्या खा. सुधाकर श्रृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन अहमदपूरचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले आहे.
आपण खा. सुधाकर श्रृंगारे यांना दिलेले मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत असणार आहे. गेल्या पाच वर्षांत खा. सुधाकर श्रृंगारे यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणला. सर्वधर्म समभाव जोपासत सर्व धर्माच्या महापुरुषांचे उत्सव स्वखर्चाने साजरे केले. गेल्या दहा वर्षात देशाचा गतीने विकास झालेला आहे. यामुळे देशाची प्रतिमा जगात उंचावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात मोफत लस, अन्नधान्य पुरवठा करुन जनतेला दिलासा दिला. राष्ट्रीय महामार्ग, विमानसेवा, वंदे भारतसह देशाच्या विविध भागात रेल्वेचे जाळे निर्माण केले. शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवून चंद्रयान यशस्वी केले. स्वतःच्या आईचे अंत्यसंस्कार करुन अवघ्या काही वेळात देश सेवेसाठी कार्यरत राहणारे, एक दिवसाचीही विश्रांती न घेता देशासाठी कार्यमग्न राहणारे यशस्वी नरेंद्र मोदींना तिसर्यांदा त्या पदावर बसविण्यासाठी खा. सुधाकर श्रृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, व्ही.एस.टी.एफ.(ग्रामोत्थान) योजनेसह विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राज्यात राबविल्या आहेत. जिवाची पर्वा न करता कोविड महामारी काळात जनतेच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मेहनत घेतली. खा. सुधाकर श्रृंगारे यांनी कोविडच्या महामारी काळात मतदारसंघात अन्नधान्याचे मोफत किट वाटप करुन जनतेला दिलासा देण्याचे काम केले होते.
खा. सुधाकरराव श्रृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देत मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले आहे.