आ. अमित देशमुख यांनी सर्वांना श्रीराम नवमीच्या दिल्या शुभेच्छा
लातुर प्रतिनिधी : दि. १७ एप्रिल २०२४
श्रीराम नवमीनिमित्त लातूर शहरातील गाव भागातील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमास बुधवार दि. १७ एप्रिल रोजी दुपारी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन सर्वांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे माजी चेअरमन गणपत बाजुळगे गणेश एसआर देशमुख रमेश सूर्यवंशी शैलेश गोजमगुंडे व्यंकटेश पुरी विष्णुदास धायगुडे ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे योगेश उन्हाळे सुशांत कुलकर्णी महेश कोराळे बबन औसेकर आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रीराम भक्त उपस्थित होते.