समाजातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे – माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातुर लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ वासनगाव येथे संवाद बैठक
संपूर्ण ताकदीनिशी डॉ शिवाजी काळगे यांना निवडून देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
लातुर प्रतिनिधी (दि. १५) : देशातील सामान्य माणसाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, समाजातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी, महागाई भरमसाठ वाढली ती कमी करण्यासाठी, उच्चशिक्षण घेऊन देखील बेरोजगार असलेल्या युवकांना रोजगार देण्यासाठी, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, ती सुधारण्यासाठी, मनरेगा अंतर्गत हाताला काम मिळावे यासाठी आपण डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार
डॉ. शिवाजी काळगे यांचा मतदारांशी परिचय व्हावा यासाठी गेल्या कांही
दिवसापासून लातुर लोकसभा मतदारसंघात सुसंवाद बैठका घेतल्या जात आहेत.
लातुर विधानसभा मतदार संघातील वासनगाव येथे सोमवार दि. १५ एप्रिल रोजी
सायंकाळी रमेश थोरमोटे पाटील यांच्या निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय
शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठक घेण्यात आली यावेळी
ते बोलत होते. या बैठकीला वासनगावसह परिसरातील जेष्ठ नागरिक, युवक
उपस्थित होते.