माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची श्रीमंत ऑटोमोबाईलला सदिच्छा भेट
लातुर प्रतिनिधी (दि. १३) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि.१३ एप्रिल रोजी लातुर शहरातील राजीव गांधी चौक भागात असलेल्या अजय मोरे यांच्या श्रीमंत ऑटोमोबाईलला सदिच्छा भेट दिली व परिसरातील व्यापारी बांधवांशी चर्चा केली.
यावेळी निरीक्षक सर्जेराव मोरे, ऍड समद पटेल,अजय मोरे, प्रवीण घोटाळे, इम्रान सय्यद, प्रा राजकुमार जाधव, पुनीत पाटील, गणेश एस. आर. देशमुख, सचिन बंडापल्ले, इसरार पठाण, यांच्यासह परिसरातील व्यापारी बांधव उपस्थित होते.