लातूर : एमबीए चे शिक्षण पुर्ण करुन खाजगी नौकरीच्या मागे न लागता धिरजकुमार यांनी स्वत:ची वेगळी वाट निवडून पापड उद्योगात यशस्वी भरारी घेतली आहे. धिरज कुमार यांनी उद्योग उभारुन युवक – युवतींसमोर आदर्श तर निर्माण केला आहे सोबतच अनेकांना रोजगार ही उपलब्ध करुन दिला आहे. मातोश्री पापड च्या फॅक्टरी आउटलेट चा शुभारंभ करुन ग्राहकांना रुचकर व पोष्टीक विविध पापडाचे प्रकार तसेच मसाले, लोणचे उपलब्ध करुन दिले आहे.
लातूर येथील जुना औसा रोड जे.जे हॉस्पिटलच्या बाजूस रेलायन्स स्मार्टच्या पाठीमागे मातोश्रीपापड च्या फॅक्टरी आउटलेट चा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ मोठ्या उत्साहात पारपडला. शुभारंभ प्रसंगी सुगरणीचे लोणचे च्या संचालिका सौ. प्रितम जाधव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर कु .सृष्टी जगताप, माजी नगरसेविका सौ.शोभा पाटील, लातूर जिल्हा कृषी अधिक्षक लाडके, रेणापूर तालुका आरोग्य अधिकारी रेड्डी सर आदी मान्यवर यांची उपस्थिती होती.
शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा उद्योग सुरू करून चार लोकांना काम देण्याचं काम धीरजकुमार यांनी केले आहे. उच्चशिक्षित तरुणाने पापडाचा उद्योग एका चांगल्या स्केल वर गेल्या दहा वर्षापासून सुरू ठेवला आहे.