असा आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम
लातूर : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 12 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध होणार असून 19 एप्रिल 2024 पर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 एप्रिल 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे. तसेच 22 एप्रिल 2024 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा कालावधी राहील. 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 4 जून 2024 रोजी होईल.