युवानेते अरविंद पाटील यांच्या बैठका लंग्यात 29 बुथ प्रमुखांच्या घरी दिल्या भेटी
निलंगा/प्रतिनिधी ः भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी शहरातील 29 बुधप्रमुखांच्या घरी भेटी दिल्या. यावेळी बुथ अंतर्गत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या बैठका घेवून निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अरविंद पाटील यांनी बुथ सक्षमीकरणासह लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय राहून प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले. बूथ प्रमुख व बूथ रचनेतील सर्व सदस्यांनी एकत्र येवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सुचना केल्या.
संपूर्ण निलंगा शहर पिंजून काढत युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी भाजपा पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. शहरातील प्रत्येक बुथवर भाजपाला मताधिक्य मिळाले पाहिजे अशी रचना करण्यात आली आहे.
नव मतदारांनी आपले पहिले मत नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी करावे. शहरात माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांनी केलेली विकास कामे व केंद्र शासनाच्या विविध योजना प्रत्येक कार्यकर्त्याने मतदारांना सांगून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करावे, असे अरविंद पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शेषराव ममाळे, वीरभद्र स्वामी, मनोज कोळ्ळे, दत्ता मोहळकर, शरद पेठकर, प्रदीप पाटील, पिंटू पांचाळ, मारुती नागदे, किशोर लंगोटे, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.