लातूर लोकसभेची उमेदवारी जाहिर झाल्यामुळे खा. सुधाकर श्रृंगारे यांनी घेतले विविध धार्मीक स्थळांचे दर्शन
लातूर लोकसभा मतदारसंघातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने माझ्या निष्ठेवर आणि कामावर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.
या निमित्ताने लातूर शहरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर, गंजगोलाई येथील देवी, हजरत सुरत शहावली दर्गा, ग्रामीण पुरातन श्री रामलिंगेश्वर मंदिर, जैन मंदिर, आदी दैवदेवतासह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आदी महापुरुषांना वंदन केले. त्याबरोबरच विविध धार्मिक स्थळातील मान्यवर गुरुजनांच्या आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष – देवीदासजी काळे, शैलेशजी गोजमगुंडे, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष– अजितजी पाटील कव्हेकर, श्री. विवेकजी वाजपेयी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष– श्री. गणेशजी गोमचाळे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश प्रदेश सचिव – मुन्नाभाई हाश्मी, शहर जिल्हा उपाध्यक्ष – शैलेश भडीकर, माजी नगरसेवक – रवी सुडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष – श्री. अजय भूमकर, मंडळ अध्यक्ष – संजय गीर, ललित तोष्णीवाल, आबा चौगुले, श्री. प्रमोद गुडे, संजय कांबळे, शिवसिंह सिसोदिया, अनिल पतंगे, नरेशजी पंड्या, लक्ष्मण खरटमोल, श्री. विजय काळे, शोभाताई कोंडेकर, रत्नमालाताई घोडके, निर्मलाताई कांबळे, पुष्पाताई भडीकर आदी सह हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.