लातूर दि.19 : जेएसपीएम लातूरद्वारा संचलित श्री स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज लातूरच्या 19 वर्ष वयोगटातील 2 विद्यार्थीनीने यश संपादन केलेले आहे. यामध्ये 19 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये 64 किलो वजन गटामध्ये प्रगती कांबळे ही विद्यार्थीनी प्रथम आलेली आहे तर शुभांगी घाडगे या विद्यार्थीनीने 74 किलो वजन गटामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविलेला आहे. यामध्ये प्रगती कांबळे या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
यासाठी क्रीडा शिक्षक बाळासाहेब शेप व विनायक टेकाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य मारूती सूर्यवंशी, उपप्राचार्य मनोज गायकवाड, उपप्राचार्य विठ्ठल चेवले, उपप्राचार्य प्रभाकर अंकुश, प्रा.हणुमंत बद्दे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.