सर्वसामान्यांचा फलंदाज ॲङ श्रीधर कसबेकर लोकसभा निवडणूकीत विजयाचा षटकार मारणार – राजेंद्र वनारसे
लातूर : सर्वसामान्यांचा सर्वांगीन व समतोल विकास व्हावा यासाठीची हि लढाई असून ॲङ श्रीधर कसबेकर हे विजयाचा शटकार मारतील असा विश्वास राष्ट्रीय संत संदेश पक्ष चे अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी व्यक्त केला. ॲङ कसबेकर यांच्या प्रचारार्थ लातूर शहरात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी राजेंद्र वनारसे बोलत होते.
यावेळी उमेदवार ॲङ श्रीधर कसबेकर, परिषदेत राष्ट्रीय संत संदेश पक्ष चे सचिव अँड शिवकुमार स्वामी, उपाध्यक्ष भास्करराव चव्हाण रामेश्वरकर, जिल्हा अध्यक्ष पांडुरंग शिंदे, उमेश उघडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना वनारसे म्हणाले की, एसी, एसटी, ओबीसी भटके विमुक्त, अल्पसंख्यांक तसेच मराठा आरक्षण सर्मथ उमेदवार असुन त्यांनी गेली वर्षभर लातूर लोकसभा मतदार संघात जनजागृती केली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांची विश्वासहार्यता वाढली असुन ते विजयाचा षटकार मारतील असे मत ही लातूर जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले.
लातूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय संत संदेश पक्ष चे अधिकृत आणि भारतीय जनविकास आघाडी चे पुरस्कृत उमेदवार अँड कसबेकर श्रीधर लिंबाजी यांचे निवडणूक लढवत आहेत. त्यांना फलंदाज’ हे चिन्ह मिळाले आहे. जनतेच्या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठविण्यासाठी व जनतेचे जिवन सुजलाम-सुफलाम करण्यासाठी त्यांना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व मतदारांपर्यंत पोहचत त्यांनी मतदारांना विश्वास दिल आहे.
सदरील बैठकीस संत संदेश पक्ष व भारतीय जनविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह लातूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.