लातूर : दिल्ली येथे फ्रेंड्स एक्झिबिशनमध्ये राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या पुढाकारातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात जेएसपीएम संचलित महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सीपीआर मॉडेलने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थी व महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंगचे समन्वयक शैलेश कचरे, प्राचार्य शिरीन सॅमसन, उपप्राचार्य एजाज नवाज, असोसिएट प्रोफेसर अझहर शेख, नसरीन बानू, शिक्षक जॉनसन राजपेठे, राजनंदिनी गायकवाड आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जेएसपीएम संस्थेचे फायणांन्स डायरेक्टर बापूसाहेब गोरे हे उपस्थित होते. बीएस्सी नर्सिंग तृतीय सेमिस्टारमधील सानिका येडे, संकेत बिरादार, प्रतिक्षा शिंदे, गिता नायकोडे, निकिता राऊत, सुप्रिया म्हेत्रे, अपेक्षा कडबाणे, सदाफ पटेल, श्रेयश, पुजा गिरी, कृष्णा कांबळे, आरती सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी सीपीआर मॉडेल, तयार करून प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. तसेच त्याची उपस्थितांना सविस्तर माहिती सांगून त्याचे महत्त्व विषद केले. या कामी नसरीन बानू यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत वार्षिक निकाल 100 टक्क्यावर आणण्याचे कामही केलेले आहे. तसेच महाविद्यालयाची विद्यार्थीनी आम्रजा गंगणे हिणे विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल जेएसपीएम संस्थेच्या सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर,संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे समन्व्यक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक संभाजीराव पाटील रावणगावकर, समन्वयक विनोद जाधव यांच्यासह प्राध्यापक व इतर कर्मचार्यांनी त्यांचे कौतुक केले.