लातूर : जि.प.जेवरी शाळेत पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत असलेले व मराठा सेवा संघचे जिल्हा सचिव जाधव एम. एम. यांची सावित्रीबाई फुले -महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
गुणवंत शिक्षक, उपक्रमशिल शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक , विद्यार्थीप्रिय शिक्षक , पालकप्रिय शिक्षक म्हणून सरांची आदर्शवत शैक्षणिक कारकीर्द आजवर आम्ही पाहिली आहे व विद्यार्थ्यांनी अनुभवली आहे. संघटनेच्या विविध पदावर कार्य करुनही ते शैक्षणिक कार्यात कुठेही कमी पडले नाहीत . वाडीतांड्यावर काम करताना अध्ययन अध्ययनात मन लावून आजवर काम करत असलेला अध्यापक म्हणजे जाधव एम.एम.होय
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, व्याख्यानमाला, सामाजिक सलोखासाठी कार्य, आनंदमेळा, अरोग्य शिबीर, दवाखान्यात आॕक्सीजन बेड देणे, विविध विषयावर व्याख्यान, हागंदारीमुक्ती मध्ये कार्य, स्वच्छता अभियानात कार्य, वृक्षारोपन, अन्नदान अशा असंख्य सामाजिक कार्यात हिरहिरीने कार्य केले आहे.