लातुर : सध्या प्रदुषणामुळे श्वसनाचे आजार लक्षणीय रित्या वाढत आहेत. त्यामुळे ॲलर्जी, अस्थमा व दुर्धर दमा, बाल दमा, ब्रॅांकायटीस यांचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमध्ये श्वसनविकार व बालदमा जास्त दिसुन आलेला आहे. या आजारांचे वेळीच निदान व ऊपचार झाल्यास पुढील होणारी गुंतागुंत टाळता येते.
दमा व दुर्धर दमा यांचे निदान स्पायरोमेट्री द्वारे करता येते परंतु लहान मुले व वयस्कर रुग्णांचे अचुक निदान करण्यासाठी ईंन्सेन्टिव्ह ओसिलोमेट्री हे अत्याधुनिक यंत्र असुन त्याद्वारे निदान सोपे होते.लातुर येथील गायत्री हॅास्पीटल येथे ही यंत्रसामुग्री प्रथमच ऊपलब्ध झाली असुन या मुळे लातुर, बीड, ऊस्मानाबाद, बीदर, गुलबर्गा, जिल्ह्यातील रुग्णांना फायदा होणार आहे.
डॅा भराटे यांनी मागील वीस वर्षात श्वसनविकार व छातीविकार या रुगणांना अत्याधुनिक सुविधा लातुर येथेच ऊपलब्ध करुन दिल्यामुळे पुणे मुंबई येथे रुग्णांना जाण्याची गरज भासत नाही. त्यांच्या या उपक्रमाचे वैद्यकिय क्षेत्रातुन कौतुक करण्यात येत आहे.