लातूर : बाबासाहेब आंबेडकर युनिव्हरसिटी लोणारे BATU वर जानाई प्रतिष्ठानचे स्नेही अभि. प्रवीण सरदेशमुख यांची महाराष्ट्र सरकारने शासकीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली या बद्दल जानाई प्रतिष्ठान विद्यार्थी मंडळाच्या वतीने अभि गौरी अतुल ठोंबरे, जानाई स्काॅलरशिप धारक विद्यार्थीनी अवंतीका प्रयाग, पुजा पिंपळगांवकर वैभवी पत्की यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
प्रवीण सरदेशमुख हे लातूर मधील शैक्षणीक, राजकीय, सामाजीक क्षेत्रातील अग्रगण्य नांव आहे. गेल्या वर्षी त्याना अभियंता जानाईश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस़्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. बाटूवरील नियुक्तीबद्दल त्यांच्यावर चौफेर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.